अभिनेत्री दीपाली सय्यद या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त नागपुरात आल्या होत्या तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नारायण राणेंना एका महिलेने निवडणुकीत पाडलं, असं विधान केलं होतं. याच मुद्द्यावरून दीपाली सय्यद यांनी अजित पवारांवर निशाणा साधत महिलांना सन्मान देत नसल्याचं म्हटलं आहे. तर मंत्रीमंडळात एकही महिला नाही यावरही त्यांनी भाष्य केलं.